| छत्रपती शिवराय आणि लोककल्याणकारी व्यक्तीमत्व या विषयावर शोधनिबंध लिहितांनी त्यांच्या व्यक्तीमत्वातील गुणसंकीर्नता पाहणे आवश्यक ठरते. छत्रपती शिवराय म्हणजे भारताचे अखंड स्फुर्तिस्थान, स्वदेश व स्वधर्म यांच्या संरक्षणार्थ आर्थिक, राजकीय दृष्टया सबळ हिंदवी स्वराज्याचे निर्माते, सार्वभौम राजा, रयतेच्या प्रतिष्ठेचा उदगाता, नूतन सृष्टीचा निर्माता, छत्रपती शिवराय म्हणजे एक महान युगपुरुष, यशवंत, किर्तीवंत, वरदवंत, पुण्यवंत, नितीवंत जाणता राजा रचनात्मक कार्य करणारा मध्ययुगातील एक सर्वश्रेष्ठ बुद्धीमान महापुरुष, पूर्वेकडील देशातील एक महान राजकारणी धुरंदर, सर्वधर्म सहिष्णू व्रताचे पालनकर्ते, लोकानेतृत्वातून राजपद मिळविणारे लोकनायक, भरताचे सुपुत्र, व्यापक विचारशक्ती आणि कल्पकता अशा विविध गुणांनीसंपन्न असलेले छत्रपती शिवरायांचे व्यक्तीमत्व आपणास दिसून येते. |